दिल्लीत अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

राजधानी दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलेवर सामूहिक बलात्कार ने अमेरिकेत गेल्यानंतर पोलिसांना ईमेलद्वारे तक्रार करुन घडल्या प्रकराची सर्व माहिती दिली. तिचा गाईड आणि अन्य चारजणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार  केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

एप्रिल महिन्यात हा प्रकार घडला होता. त्यानंतर या अमेरिकन महिलेने कॅनोट प्लेस येथील पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांकडून घटनेची प्राथमिक चौकशी केला जात आहे.

दरम्यान, दिल्लीत फिरण्याच्यानिमित्ताने तिची एका गाईडशी ओळख झाली. त्याने या महिलेला अनेक पर्यटनस्थळांवर नेले होते. यादरम्यान, दोघांची चांगली मैत्रीही झाली. त्यानंतर एके दिवशी तो आपल्या आणखी मित्रांसह हॉटेलमधील खोलीवर आला होता. त्यावेळी त्या सगळ्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

तिने सांगितले की, मला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे लक्षात आले. मी या प्रकाराची वाच्यता केली तर भयानक परिणाम होतील, अशी धमकीही मला देण्यात आली होती, असे महिलेने तक्रारीत म्हटलेय. मला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी या महिलेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *