गुहागरमध्ये आढळला मृत बिबट्या

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील शीर गावात मृत बिबट्या सापडला. शीर गावातील भुवडवाडीमधील ग्रामस्थांना हा बिबट्या दिसला होता. याची माहिती गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली.

पोलीस पाटलांनी त्वरित वन विभागला याची माहिती दिली आणि वन विभागची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला आणि डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू हा हॄदयविकाराच्या झटक्यानी झाल्याच सांगण्यात आलंय.

चार दिवसांपूर्वी या बिबट्या मृत्यू झाल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय. यानंतर बिबट्यावर वन विभागने अंत्यसंस्कार केले .रत्नागिरी जिल्ह्यात मागील 2 महिन्यात विविध घटनांमध्ये 6 बिबट्यांचा मृत्यू झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *