चांदीच्या भावात सुधारणा

जागतिक पातळीवरील तेजी आणि स्थानिक पातळीवर वाढलेली खरेदी यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी चांदीचा भाव १५0 रुपयांनी वाढून ४0,८५0 रुपये किलो झाला. सोने मात्र स्थिर राहिले.

जागतिक बाजारांपैकी प्रमुख बाजार असलेल्या सिंगापुरात चांदी 0.३६ टक्क्यांनी वाढून १६.५४ डॉलर प्रति औंस झाली. सोनेही 0.२८ टक्क्यांनी वाढून १,१७४.९0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत तयार चांदी १५0 रुपयांनी वाढून ४0,८५0 रुपये किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी ५0 रुपयांनी वाढून ४0,0५0 रुपये किलो झाली. चांदीचे शिक्के खरेदीसाठी ७४ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७५ हजार रुपये प्रति शेकडा असे स्थिर राहिले.

दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव अनुक्रमे २९,000 रुपये आणि २८,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम असा स्थिर राहिला. गेल्या दोन दिवसांत सोने ४५0 रुपयांनी उतरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव ५0 रुपये वाढून २४,४00 रुपये प्रतिनग झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *