वांद्रे परिसरात गुरुवारी बाइक रेसिंगने एका तरुणाचा बळी घेतला आहे, तर दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे.
वांद्रे परिसरातील अशफाक अहमद खान (१९) हा महाविद्यालयीन विद्यार्थी गुरुवारी रात्री १च्या सुमारास मित्रासोबत रेसिंग करत होता. त्या वेळी अचानक त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी घसरली आणि तो रस्त्याच्या कडेला फेकला गेला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या दोघांनाही भाभा रुग्णालयात दाखल केले. तेथील खानला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले तर त्याचा मित्र दानिश सिद्दिकीवर (२०) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खान कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तर सिद्दिकी कुटुंबीय चिंतेत आहेत.
या प्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.
