प्राध्यापिकेला धमकावून बलात्कार करणारा विद्यार्थी अटकेत

विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने प्राध्यापिकेला धमकावून तिच्यावर  बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

कुलदीप साव (वय २७, रा. विजयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. यासंदर्भात एकतीस वर्षीय प्राध्यापिकेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलदीप हा एका अभिमत विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तेथे सहायक प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या महिलेशी कुलदीपची ओळख झाली होती. सप्टेंबर महिन्यात कुलदीपने तिला महंमदवाडी भागात नेले होते. तेथे तिला धमकावून त्याने बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने तिची अश्लील छायाचित्रे मोबाईलवर काढली. छायाचित्रे समाजमाध्यमातून प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

तिच्याकडे पैशांची मागणी केली. त्याच्या धमक्यांना घाबरलेल्या प्राध्यापिकेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी कुलदीपला अटक करून लष्कर येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ७ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *