अनिल कपूरनेही एटीएमबाहेर लावली रांग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यामुळे सर्वसामान्यांसोबत सेलिब्रेटिंनाही त्रास होत असल्याचं दिसत आहे. नुकतंच अभिनेता अनिल कपूरने पैसे काढण्यासाठी एका एटीएमबाहेर रांग लावली. रांगेत उभे असणा-या त्याच्या चाहत्यांनी याच संधीचा फायदा घेत त्याच्यासोबत सेल्फी काढून ट्विटरवर शेअर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बॉलिवूडकरांनीही त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. विरोधकांनी तर फक्त सर्वसामान्यच एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगा लावताना दिसत असल्याचं सांगत मोदींवर टीका केली होती. मात्र अनिल कपूरनेही एटीएम रांगेत दिसल्याने हा त्रास सर्वसामान्यांइतकाच सेलिब्रेटिंनाही होत असल्याचं दिसत आहे.
अपुर्वा यावेळी त्या रांगेत उभी होती. आपल्यासोबत अनिल कपूरदेखील रांगेत उभे आहेत यावर तिचा विश्वासच बसला नाही. पण याच संधीचा फायदा घेत अपुर्वाने अनिल कपूरसोबत सेल्फी काढून ट्विटरवर फोटो शेअर केले. तिच्या ट्विटला 700 जणांनी रिट्विट केलं. फोटो अपलोड केल्यापासून माझे 200 फॉलोअर्स वाढले असल्याचंही अपुर्वाने सांगितलं आहे.

अनिल कपूरनेदेखील अपुर्वाच्या ट्विटला उत्तर देत ‘एटीएम रांगेत सेल्फी घेत आहे. नोटाबंदीमुळे माझ्या चाहत्यांना भेटण्याची संधी मिळाल्याचं’, म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *