१५ अब्ज नोटा नष्ट होणार; महाराष्ट्रातील तीन ठिकाणी काम सुरू

पाचशे, हजारच्या नोटांवरील बंदीनंतर लोकांनी बँकांत भरलेल्या १५ अब्ज नोटा रिझर्व्ह बँकेला नष्ट कराव्या लागणार आहेत. हे काम महाराष्ट्रातील तीन ठिकाणी सुरूही झाले आहे.

मुंबईतील फोर्ट तसेच बेलापूर आणि नागपूर येथे बंद झालेल्या नोटांची छानणी, पडताळणी आणि त्यानंतर यंत्राद्वारे कटाई (तुकडे करण्याचे काम) करण्यात येत आहे. एकट्या मुंबईतून नोटांच्या ७0 हजार ते ८0 हजार गोण्या कटाई केंद्रांवर पाठविल्या जाऊ शकतात. यंदा छोट्या रकमेच्या नोटांची कटाई बंद राहण्याची शक्यता आहे.

मार्च २0१६ पर्यंत हजार रुपये किमीच्या ६,३२६ दशलक्ष, तर पाचशे रुपये किमतीच्या १५,७0७ दशलक्ष नोटा चलनात होत्या. ८ नोव्हेंबरपूर्वी चलनात असलेल्या या सर्व पाचशे व हजारांच्या बंद नोटा कटाईसाठी आमच्याकडे येतील, असे वाटत नाही. ७0 टक्के बंद नोटा आमच्याकडे येतील.

तूर्त नोटा बँकांकडेच राहणार

प्रचंड संख्येने येत असलेल्या बाद नोटा ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे त्या

तूर्त बँकांकडेच ठेवल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *