नवाज शरीफांकडून डोनाल्ड ट्रम्पना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आहे. नवाज शरीफ यांच्याशी बातचीत झाल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी अमेरिका महत्वाची भुमिका पार पाडेल असं आश्वासन दिलं आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानचा दौरा करण्याची आणि नवाज शरीफ यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. ट्रम्प यांच्याकडून मात्र असं कोणतंही संभाषणा झाल्याचा वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसंबंधी बोलताना अनेकदा टीका केली आहे. पाकिस्तानध्ये दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय यावरुनही ट्रम्प यांनी पाकिस्तानला टार्गेट करत भाष्य केलं होतं. लादेनची माहिती पुरवणा-या पाकिस्तानी डॉक्टरला कारागृहात कोणतीच मदत न करु शकणा-या ओबामा प्रशासनावरही ट्रम्प बरसले होते.

ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवाज शरीफ यांचे राष्ट्रीय सल्लागार सरताज अझीझ यांनी पाकिस्तान दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *