वादळी वाऱ्याने ७३ झाडे पडली

वादळी वाऱ्याने ७३ झाडे पडली

मुसळधार पावसाने मध्यरात्रीपासून घातलेल्या धुमाकुळात मुंबईतील अनेक ठिकाणी घरांच्या भींती आणि झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. नरिमन पॉइंट येथे असलेल्या शालीमार इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळल्याने एक २५ वर्षीय युवक जखमी झाला.

पावसामुळे मुंबई शहरात ३१, पूर्व उपनगरात १० तर पश्चिम उपनगरात ३२ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. माहीममधील सिल्वेरा चाळीतील एका घराची भींत कोसळली असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

वडाळा येथे बॉम्बे डाइंग मिल व ऑटोमेटिकल इलेक्ट्रिकल कंपनीच्या कंपाउंडची भींत बाजूला उभ्या असलेल्या वाहनावर कोसळली तर अन्य एका घटनेत घरावर प्लास्टिक लावण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा हायटेंशन वायरशी संपर्क आल्याने तो जखमी झाला. उपचारासाठी या तरुणाला तत्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *