बस स्टँडवर झळकली पॉर्न फिल्म

केरळमधील कलपेट्टा येथील बस स्टॅंडवरील टीव्हीवर जाहिरातीच्या दरम्यान पॉर्न फिल्म सुरू झाल्या प्रकरणी एका केबल ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे. केबल ऑपरेटरने देखील आपली चूक झाली असल्याचे मान्य केले.

कलपेट्टाच्या बस स्टँडवर मंगळवारी नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. बस स्टँडवर जाहिराती आणि बस सेवेची माहिती देण्यासाठी टीव्ही बसवण्यात आलेले आहेत, त्यावर नेहमीप्रमाणे जाहिराती सुरू होत्या. अचानक टीव्हीवर पॉर्न फिल्म सुरू झाली आणि प्रवशांची पळापळ सुरू झाली. महिला प्रवासी आणि मुलींनी बसस्टँड बाहेर धाव घेतली. काही प्रवाशांनी टीव्ही बंद करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना टीव्ही बंद करता आला नाही. बस स्टँडवर उपस्थित अलेल्या कर्मचाऱ्यांनाही टीव्ही बंद करता आले नाही. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई केली.

टीव्हीचा प्रोग्राम सेट करताना मंजुर नावाच्या केबल ऑपरेटरकडून ही चूक झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. आपल्याकडून चूक झाल्याचे कबुली केबल ऑपरेटरकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *