आईच्या गोळ्या खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू

आईच्या गोळ्या खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू

१३ मध्ये राहणाऱ्या दीड वर्षीय चिमुरडीने आईच्या औषधांच्या गोळ्या खाल्ल्याने तिचा दुर्दैवी अंत दुःखद घटना उघडकीस आली आहे. पूर्वा (दीड वर्षे) असे या चिमुरडीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पूर्वा खारघर सेक्टर- १३ मध्ये आई- वडिलांसह रहायला होती. मंगळवारी रात्री खेळत असताना आईच्या गोळ्या पूर्वाच्या हाती लागल्या आणि तिने त्या खाल्ल्या. गोळ्यांच्या प्रभावामुळे पूर्वा काही वेळातच बेशुद्ध पडली. तिच्या आई- वडिलांनी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यांनी तिला नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी पूर्वाला मृत घोषीत केले. पूर्वाच्या मृत्युप्रकरणी नेरुळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूर्वाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून, त्यात तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *