मुसळधार पावसामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईच्या लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या पश्चिम, मध्य आणि हार्बर लोकल सेवा देखिल ठप्प आहे.
मुंबईसाठी खरं आव्हान दुपारी अडीच वाजता येणाऱ्या समुद्राच्या भरतीचं आहे, कारण दुपारी अडीच वाजता ४.४७ मीटरच्या लाटा उसळणार आहेत, म्हणजेच समुद्राला उधाण येणार आहे, तर दुसरीकडे पाऊस सुरूच असल्याने परिस्थिती अधिक भीषण होण्याची शक्यता असल्याने, मुंबईत अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाच्या कामाशिवाय बाहेर न जाण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. आठ तास उलटूनही अजूनही मुंबईची लाईफ लाईन ठप्पच आहे. (1.44 PM)
माटुंगा कुर्ली दरम्यान अजूनही ट्रॅकवर पाणी (1.42PM)
शहरात ६३ ठिकाणी पाणी साचलंय, मुंबई विद्यापिठाच्या परिक्षा देखिल पुढे ढकलण्यात आल्याचं, विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे. (1.40 PM)
मुंबई विमानतळावर येणारी-जाणारी विमानं ३० ते ४५ मिनिटं उशीराने, पावसामुळे १८ उड्डाणं रद्द 1.29 PM
मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाला भेट, अडीच वाजता येणारी भरती हे आणखी एक आव्हान – सीएम 1.24 PM
मुंबई हायकोर्टाच्या चिफ जस्टिस यांच्याकडून पावसामुळे कोर्टाला सुटी जाहीर, सेशन कोर्टाचंही आज कामकाज बंद 1.21 PM
फरहान अख्तरचं ट्वीट – मला वाटतं मुंबईकरांचा टॅक्सचा पैसा, मुंबईचं ड्रेनेज सिस्टम ब्लॉक करण्यासाठी वापरला जातो – 1.16 PM
फिल्मसिटीतही अनेक ठिकाणी पाणीसाचलं, काही स्टुडिओंमध्ये पाणी शिरल्याने शूटिंग थांबवण्याची वेळ – 1.15 PM
मुसळधार पावसामुळे पाच तासानंतरही मुंबई लोकल ठप्प आहे, पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प आहे, २६ जुलै २००५ नंतर पहिल्यांदा मुंबई लोकलवर ही स्थित ओढवली आहे. ( 12.44 PM)
पावसामुळे कार्यालयांमध्ये उपस्थिती कमी असल्याने, डबे वाल्यांची सेवा आज बंद ( 11.44 AM)
शक्य असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यास या, स्कूल बस असोसिएशनचं आवाहन, पाणी आणि खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता- स्कूल बस असोसिएशन (11.40 AM)
बेस्टच्या चालकांना कामावार पोहोच्याच्या सूचना ( 11.31 AM)
सुरक्षेच्या कारणास्तव दक्षिण मध्य मुंबईतला वीज पुरवठा ताप्तुरता बंद (11:34 AM)
दक्षिण मुंबईपासून उपनगरांत सकाळपासून धो-धो पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलंय. कुलाब्यात २४ तासात २०४ मिलि मीटर पाऊस झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
काही बेस्ट चालकांना वेळेवर पोहोचता येत नसल्याने, बेस्ट सेवा ही अनियमित झाली आहे, पाणी साचत असल्याने टॅक्सी चालकांनीही ‘आगे टॅक्सी नही जायेगा’ चा मंत्र सुरू केला आहे.
रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे ऑफिसला उपस्थिती कमी असल्याने डबे वाल्यांनीही आज सेवा बंद केली आहे.
महापालिकेने सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत. आज दुपारी अडीच वाजता हायटाईड असल्याने पाऊस सतत सुरू असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा अंदाज आहे.

