घरातून पळून गेलेल्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या दोन आरोपींना पोलिसांनी व्हॉट्सअॅप डीपीच्या आधारे अटक केली आहे. आई ओरडल्यामुळे पीडित मुलगी घर सोडून गेली होती. एका सार्वजनिक गार्डनमध्ये तिने आश्रय घेतला होता, ती एकटी असल्याचा फायदा घेत दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. क्राईम ब्रांचने शक्कल लढवत आरोपींना अटक केली आहे. मिथून कैलाश म्हात्रे आणि अमित नरेश वेता अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही रिअल इस्टेट एजंट असून कोपरखैरणे येथे राहतात.
‘पीडित मुलीची आई नेरुळमध्ये एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. मुलीच्या आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, मात्र आईने आपल्याला सोबत येण्यास मनाई केल्याने मुलगी रागावली होती. रागात मुलगी घरातून पळाली आणि कौपरखैरणे येथील सेक्टर 19 मधील एका गार्डनमध्ये आश्रय घेतला. दुस-या संध्याकाळी आरोपी तरुणांनी ती एकटी असल्याचा फायदा घेत मदत करण्याच्या बहाण्याने तिला आपल्या सोबत नेलं आणि बलात्कार केला. 24 नोव्हेंबरला आरोपींनी तिला वाशी स्थानकाबाहेर सोडलं. पीडित मुलगी बस पकडून आपल्या नातेवाईकाकडे गेलीट, अशी माहिती तपास पोलीस अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
पीडित मुलीने पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. त्या आधारावर पोलिसांनी स्थानिक तरुणांकडे आरोपी तरुणांबद्दल चौकशी केली. तपासावेळी 10 जणांवर संशयाची सुई होती. त्या सर्वांचे मोबाईल नंबर सेव्ह करुन व्हॉट्सअॅप डीपीवरुन त्यांचे फोटो मिळवले. मुलीने त्यातील आरोपी तरुणांना ओळखलं असता आरोपीला अटक करण्यात आली. दोघा आरोपींनी 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

