सावंतवाडीमध्ये नारायण राणेंचा दीपक केसरकरांना धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना धक्का दिला आहे. सावंतवाडी नगरपालिकेत काँग्रेसला १७ पैकी ८ जागांवर विजय मिळाला आहे तर, शिवसेनेला सात, भाजपला १ आणि अपक्ष उमेदवाराला १ जागा मिळाली आहे. मागच्यावेळी केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी यांनी १७ पैकी १७ जागांवर एकहाती विजय मिळवला होता.
सिंधुदुर्ग नगरपालिका
सावंतवाडी – काँग्रेस ८,  शिवसेना ७, भाजप १, अपक्ष १
वेंगुर्ला – मालवण – राष्ट्रवादी १, काँग्रेस १
देवगड-जामसांडे – काँग्रेस २, भाजप १, अपक्ष १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *