आई रागावल्याने सातवीतल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

आई रागावली म्हणून सातवीतल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडलीये.

अस्तिक दीपक बोरसे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पंकज विद्यालयात सातवी इयत्तेत शिकत होता.

आस्तिकला त्याच्या आईने क्लासला जायला सांगितले आणि ती पाणी भरायला निघून गेली. यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून आस्तिकने गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच आस्तिकला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *