लातूर न्यायालयात महिलेने स्वत:ला जाळून घेतले

लातूर न्यायालयात महिलेने स्वत:ला जाळून घेतले

लातूर येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत राहीबाई सुरवसे या महिलेने स्वत:ला जाळून घेतले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

या महिलेने न्यायालयाच्या तिस-या मजल्यावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात ही महिला ७० टक्के भाजली असून तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

धनेगाव येथील राहीबाई यांच्या जमिनीच्या वादाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्याची आज तारीख होती. मात्र या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *