शॉर्ट सर्किटने, मुलुंड कॉलेज आॅफ कॉमर्स महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर लॅबला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे.
पश्चिमेला असणाऱ्या या महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर लॅबला दुपारी १२.४५ च्या सुमारास वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्ट सर्किट आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी ३०-४० मिनिटांत आग नियंत्रणात आणली.
