चीनमध्ये निर्माणाधीन पॉवर स्टेशन कोसळले, 40 जणांचा मृत्यू

चीनच्या पूर्व भागात एक निर्माणाधीन पॉवर स्टेशन कोसळल्याने जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ढिगा-याखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जियांक्षी प्रांतात ही दुर्घटना घडली आहे.
चीनमधील मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य सुरू असून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान, या अपघातामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, कोसळलेली निर्माणाधीन इमारत ही कूलिंग टॉवर असून त्याच्या टॉवरचे बांधकाम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *