आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेचे आज झालेला उद्धाटन सोहळा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. उद्धाटन सोहळ्या दिवशीच हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी या एक्स्प्रेस थरारक कसरती करत लँडिंग केले. या विमानांमध्ये हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज प्रकारातील लढाऊ विमानांचा समावेश होता.
आग्रा ते लखनऊ हा 302 किमीचा महामार्ग बांधण्यासाठी 15 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच या मार्गाचे बांधकाम अवघ्या 23 महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान आज झालेल्या उद्धाटन सोहळ्यावेळी सुखोई विमाने बरेलीहून तर मिराज विमाने ग्वाल्हेरहून उड्डाण करत महामार्गावर उतरली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानांचे महामार्गावरील लँडिग भारताच्या रणनीतिक तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. तसेच आणीबाणीच्या प्रसंगी देशातील हवाई तळ व्यस्त असल्यास महामार्गांचा धावपट्टीसारखा वापर करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून चाचपणी करण्यात येत आहे.
