17 वर्षांच्या संसारानंतर अर्जुन रामपाल घटस्फोटाच्या वाटेवर?

17 वर्षांच्या संसारानंतर अर्जुन रामपाल घटस्फोटाच्या वाटेवर?

हृतिक आणि सुझान यांच्या घटस्फोटानंतर बॉलिवूडमधलं आणखी एक दीर्घकाळापासून विवाहबंधनात अडकलेलं जोडपं घटस्फोटाच्या मार्गावर आहे. अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर जेसिया परस्पर संमतीने घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आहे. मेहर ज्येष्ठ वकील मृणालिनी देशमुख यांच्याकडून सल्ला घेत असल्याची माहिती आहे.

हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाला अर्जुन रामपाल जबाबदार असल्याच्या वावड्या काही महिन्यांपूर्वी उठल्या होत्या. त्यानंतर अर्जुन-मेहर काडीमोड घेणार असल्याच्या चर्चा होत्या. अर्जुन आणि सुझैन यांचे प्रेमसंबंध असल्याच्या अफवांनाही ऊत आला होता.

अर्जुन रामपालने 199 मध्ये माजी विश्वसुंदरी आणि सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. अर्जुन-मेहरला 13 वर्षांची महिका आणि 10 वर्षांची मायरा या दोन मुली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *