चीनमध्ये झालेल्या भीषण आणि विचित्र अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाले आहेत. बीजिंग – कुनमिंग एक्स्प्रेस-वेवर झालेल्या या अपघातात 59 गाड्या एकमेकांवर आदळल्या. उत्तर चीनमधील शांजी प्रांतात ही घटना घडली. पाऊस आणि बर्फामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी 9 वाजता हा अपघात झाला. 59 गाड्या एकमेकांवर आदळल्या यावरुनच अपघाताची भीषणता लक्षात येऊ शकते. 17 जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं. अपघातामागच्या कारणाची तपासणी केली जात आहे.
