बँक अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

चलनकल्लोळात मालाडच्या एका अधिकाऱ्याला स्वत:चे बोट गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच साकीनाका येथील एका बँक अधिकाऱ्याचा अधिकचा तणाव आल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शबीर वावडा (५०) असे या मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अंधेरी पूर्वतील साकीनाका परिसरात असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या मिड कॉपोर्रेट फायनान्स शाखेत ते शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. वावडा हे सकाळी घरातून निघाले. तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. तरी देखील कामाची जबाबदारी लक्षात घेत ते बँकेत आले. तेव्हा त्यांच्या अचानक छातीत दुखायला लागले. त्यामुळे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *