घटस्फोटीत महिलेस विवाहाचे अमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणा-या नगरसेवकपुत्र अजिंक्य शिवाजी चुंभळेविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा तर लाईफ केअर हॉस्पिटलमधील डॉ़. उमेश मराठे विरोधात खोट्या कागदपत्रांद्वारे महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. न्यायालयाने डॉ़. मराठेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
पिडीत महिलेने दिलेल्या पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सोशल मीडीयाच्या माध्यमातून नगरसेवकपुत्र अजिंक्य चुंभळेशी ओळख झाली़ विवाहाचे अमिष दाखवून चुंभळेने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले़ यातून फेब्रुवारी २०१५ मध्ये दिवस गेले असता भावाचे लग्नाचे कारण सांगून लेखानगरमधील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये प्रीती पाटील असे खोटे नाव नोंदवून डॉ़उमेश आऱ मराठे यांनी गर्भपात केला़
इंदिरानगर पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून अजिंक्य चुंभळेविरोधात गुन्हे दाखल केला आहे़ न्यायालयाने त्यास २३ नोव्हेंबरपर्यंत अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून दोन तास पोलीस ठाण्यात हजेरी देण्याचे आदेश दिले आहेत़ तर महिलेचा गर्भपात करणारे डॉ़उमेश मराठेची शनिवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर पुरावे मिळताच सोमवारी अटक करण्यात आली़ त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़.
