स्पाइसजेटची धमाकेदार ऑफर, केवळ 737 रूपयात विमान प्रवास

विमानसेवा देणारी कंपनी स्पाइसजेट धमाकेदार ऑफर घेवून आली आहे. “स्पायसी अॅन्युअल सेल” अंतर्गत 4 दिवसांसाठी ही ऑफर असून केवळ 737 रूपयांमध्ये वन-वे विमान प्रवास करता येणार आहे.  नोटबंदीमुळे त्रासलेल्या नागरिकांना दिलासा देत 24  नोव्हेंबरपर्यंत 500 आणि 1000 रूपयांच्या नोटाही स्वीकारल्या जातील मात्र या पैशांद्वारे बूक केलेले तिकीट नॉन रिफंडेबल असतील अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
सोमवार (दि. 21) ते 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही ऑफर असून याद्वारे  9 जानेवारी 2017 पासून 28 ऑक्टोबर 2017 पर्यंतचं विमान तिकीट बूक  करता येणार आहे. 500 किलोमीटर अंतरापर्यंतच्या देशांतर्गत प्रवासासाठी ही ऑफर असणार आहे. यामध्ये चेन्नई-कोइंबतूर-चेन्नई, जम्मू-श्रीनगर-जम्मू, चंदीगड-श्रीनगर-चंदीगड आणि आगरतळा-गुवाहाटी या मार्गांचा समावेश आहे.
www.spicejet.com, स्पाइसजेट मोबाइल अॅप, एअरपोर्ट ऑफिस किंवा  ट्रॅव्हल एजेंटद्वारा तिकीट बूक करून या  ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *