किरकोळ वादातून निर्माण झालेल्या हाणामारीमुळे एका तरुणाला स्वतःचा जिव गमवावा लागला आहे. नागपुरातील लक्ष्मीभुवन चौकातील ही धक्कादायक घटना आहे.
पबमध्ये झालेल्या किरकोळ वादातून शुभम महाकाळकर या तरुणाची अज्ञातांनी हत्या केली आहे. ‘क्लाऊड सेव्हन’ या पबमध्ये रविवारी रात्री दोन गटांत भांडण झाले. या वादाचे पर्यावसन मारहाण आणि तोडफोडीमध्ये झाले. त्यानंतर भांडणाचा राग मनात ठेवत दुस-या गटाने शुभमवर हल्ला करत त्यांची हत्या केली.
दरम्यान, हत्येनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे.
