ब्रेक अप के बाद…’ हृद्याचे नाही तर, प्रेयसीसोबत शेअर केलेल्या वस्तुंचे तुकडे करुन ऑनलाईन विक्री!

ब्रेक अप के बाद…’ हृद्याचे नाही तर, प्रेयसीसोबत शेअर केलेल्या वस्तुंचे तुकडे करुन ऑनलाईन विक्री!

काय रे! हृद्याचे तुकडे तुकडे झाले ना!… ‘ब्रेक अप’नंतर मित्रांकडून हमखास ऐकवलं जाणारं वाक्य. प्रेमभंग झाला की ‘तिच्या’ आठवणीत दर्दभरी गाणी ऐकणारे अनेक मजनू आपण पाहतो. पण एका अवलियाने ‘ब्रेक अप’नंतर एक आगळा-वेगळा पराक्रमच केला आहे.

‘तुझ्या त्या आठवणी मी कसा विसरु? तू दिलेल्या त्या वस्तू मला तुझी कायम आठवण देत राहतील…’ अशी वाक्यही एखादा प्रियकर शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्या प्रेयसीवर फेकतोच. पण अशाचा एका प्रेमभंग झालेल्या प्रियकराने चक्क आपल्या प्रेयसीसोबत वापरलेल्या सगळ्या वस्तूचे दोन तुकडे करुन ते ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट ‘ई-बे’वर विक्रीला ठेवले आहेत.

या वस्तू देखील साध्यासुध्या नाहीत. तर कार, आयफोन मोबाईल, अॅपलचा लॅपटॉप यांचा यात समावेश आहे. या पठ्ठ्याने चक्क सगळ्या वस्तूंचे दोन तुकडे केले आहेत. काय विश्वास बसत नाही ना! पण हे खरं आहे.

या प्रेमवीराने तिच्यासोबत वापरलेल्या छोट्या-छोट्या वस्तूंपासून अगदी मोठ्या वस्तूंचेही दोन भाग केले आहेत. टेडी बेअर, खुर्ची, आयफोन, टीव्ही याचे देखील त्याने तुकडे केले आहेत. या वस्तूंचे अर्धे भाग त्याने ई-बे ऑनलाइन शॉपिंग साईटवर विक्रीसाठी ठेवले आहेत. तर याचे अर्धे भाग त्याने आपल्या प्रेयसीकडे पाठविले आहेत.

प्रेमात जीव देणारे अनेक प्रेमवीर आजवर सिनेमात किंवा खऱ्या आयुष्यात आपण पाहिले आहेत. पंरतु प्रेयसी सोडून गेल्याच्या दुख:त लाखमोलाच्या वस्तूंचा अशाप्रकार चुराडा करणारा हा व्यक्ती एकमेवच असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *