राजा माने यांना पाध्ये पुरस्कार प्रदान

राजा माने यांना पाध्ये पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंत पाध्ये पुरस्कार  सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांना बुधवारी प्रदान करण्यात आला.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कवी अशोक नायगांवकर प्रमुख पाहुणे होते. राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर मंचावर उपस्थित होते. राऊत यांच्या हस्ते माने यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या समारंभात प्रारंभी श्रीकांत चाळके यांनी संघाच्या कार्याचा परिचय करून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *