स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून गुगलनेही खास बालदिनानिमित्त स्पेशल डूडल तयार केलेय.
यंदाचे हे डूडल आणखी एका कारणासाठी स्पेशल आहे ते म्हणजे पुण्याच्या अन्वितान हे डूडल बनवलेय. सहावीत शिकणारी अन्विता या वर्षी झालेल्या Doodle 4 Google या स्पर्धेत विजयी झाल्याने तिचे डूडल गुगलच्या होमपेजवर लावण्यात आलेय.
तणावपूर्ण अशा या जीवनात लहान लहान क्षणांचा आनंद घेतला पाहिजे आणि तो निसर्गातून मिळतो असाच काहीसा संदेश तिने या डूडलमधून दिलाय.