मोपा विमानतळ पायाभरणीसाठी पंतप्रधान आज गोव्यात

गोव्याच्या विकासाचा ‘माईलस्टोन’ ठरू शकणा-या पेडणे तालुक्यातील मोपा येथील देशातल्या तेराव्या आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळाची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, १३ रोजी गोव्यात येणार आहेत.

बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते मोपा विमानतळ आणि पेडणे तालुक्यातील तुयें येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सीटीचा शिलान्यास बसवण्यात येणार आहे. मोदी यांच्या भेटीच्या तयारीचा मुख्यमंत्री पास्रेकर यांनी शनिवारी एका वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आढावा घेतला.

पंतप्रधान मोदी १३ नोव्हेंबर रोजी थेट जपान दौ-यावरूनच गोव्यात येणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता त्यांचे दाबोळी विमानतळावरील हंसा तळावर खास विमानाने आगमन होणार आहे. तेथून मोदी नौदलाच्या हेलिकॉप्टरने राजभवनवर जाणार आहेत. त्यानंतर मोटरने बांबोळीला समारंभस्थळी दाखल होणार आहेत.

या स्टेडियमवर सुमारे १० हजार लोकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममधील व्यासपीठावरून रिमोट कंट्रोल प्रणालीने दोन्ही प्रकल्पांची पायाभरणी बसवणार आहेत. या सोहळ्याला राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर, संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर यांनी प्रधानमंत्र्यांच्या भेटीच्या तयारीचा शनिवारी आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला मुख्य सचिव आर. के. सिंग, पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांच्यासह राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *