टीम इंडियाची सूत्रं कर्णधार धोनीच्या हाती, आज बांगलादेश विरुद्ध पहिला वन डे सामना

टीम इंडियाची सूत्रं कर्णधार धोनीच्या हाती, आज बांगलादेश विरुद्ध पहिला वन डे सामना

भारत आणि बांगलादेशमधल्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात होते आहे. दोन्ही देशांमधला फतुल्ला इथला एकमेव कसोटी सामना पावसानं वारंवार व्यत्यय आणल्यामुळे अनिर्णित राहिला होता. आता वन डे मालिकेत तरी दोन्ही संघांमधली टक्कर रंगतदार ठरेल अशी अपेक्षा आहे.

दोन्ही संघांमध्ये आजवर झालेल्या 29 वन डे सामन्यांपैकी 25 वेळा भारतानं विजय साजरा केला आहे. तर तीनच सामने बांगलादेशनं जिंकले आहेत. कसोटी कर्णधार विराटकडून टीम इंडियाची सूत्रं वन डे कर्णधार धोनीच्या हाती गेली आहेत.

धोनी ब्रिगेड आता बांगलादेशवर निर्विवाद वर्चस्व गाजवणार, की बांगलादेश एखादा चमत्कार करणार, याविषयी चाहत्यांना उत्सुकता वाटते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *