पैसे मोजा, पदवी घ्या!

४० ते ६० हजार रु., टीवायबीएससी : ३० हजार रु., टीवायबीकॉम : २० ते २५ हजार रु….कुणालाही हे आकडे डोनेशनसाठीचे वाटतील. पण ही किंमत आहे पदवी परीक्षेतील कोणत्याही एका विषयात हवे तितके गुण मिळवण्याची! मुंबई विद्यापीठात शिक्षणाचा हा बाजार सुरू असून, परीक्षा केंद्राची ही सडकी व्यवस्था लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईने समोर आली.  कलिना विद्यापीठाचे जणू ‘स्कॅनिंग’ करून या गुणवाढ घोटाळ्याचे पदर उलगडले आहेत. धक्कादायक म्हणजे केवळ दोन-तीन गुण मिळालेला विद्यार्थीही त्याच्या ऐपतीनुसार गुणांचा आकडा वाढवू शकतो, अशी माहिती  हाती लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *