सैफ अली खान हाजीर हो! आज कोर्टात हजर राहण्याची सक्त ताकीद

सैफ अली खान हाजीर हो! आज कोर्टात हजर राहण्याची सक्त ताकीद

ताज हॉटेलमधील मारहाणप्रकरणी अभिनेता सैफ अली खानला कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात हजर राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळं आज मुंबईच्या किला कोर्टात सैफ खानला हजर राहावं लागणार आहे.

वारंवार तारखा घेऊन पण सैफ अली खान न्यायालयात सुनावणी करता हजर राहत नव्हता. त्यासाठी सैफ अली खानविरोधात अटकेचा वॉरंट काढावा असा अर्ज सरकारी वकील वाजीद शेख यांनी  केला होता. त्यावर न्यायालयानं सैफ अली खानला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २२ फेब्रुवारी २०१२ साली सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांसह ताज हॉटेलमध्ये आलेल्या इक्बाल शर्मा नावाच्या व्यक्तीला मारहाण केली होती.

या प्रकरणी इक्बाल शर्मा यांनी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार प्रकणाचा तपास करुन कुलाबा पोलिसांनी या प्रकरणात आरोप पत्र दाखल केलं होतं. आता हे प्रकरण अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीची तारीख न्यायालयाकडून निश्चित केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *