महानायक अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चन यांच्यावर तिरंग्याचा अवमान केल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी गाझियाबाद कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाझियाबादमधील ‘मित्र’ या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य चेतन धीमान यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे बच्चन कुटुंबिय अडचणीत आलं आहे.
नुकतंच मॅगीची जाहीरात केल्याप्रकरणात अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सुरू झालेली ससेमीरा अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
भारत – पाक मॅचदरम्यान तिरंगा खांद्यावर
विश्वचषक सामन्यात 15 फेब्रुवारी 2015 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होता. त्यावेळी अमिताभ आणि अभिषेक यांनी तिरंगा उंचावला होता. त्यानंतर त्यांनी तोच तिरंगा खांद्यावर बांधल्याचा आरोप आहे.
बच्चन यांच्या या पवित्र्यामुळे तिरंग्याचा अवमान झाला, असा आरोप चेतन धीमान यांचा आहे.
याप्रकरणाची सुनावणी 13 जुलै रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते चेतन धीमान यांचे वकील संजीव शर्मा यांनी सांगितलं.

