मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवार विराजमान झाले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखालील पवार-महाडदळकर गटाने एमसीएवर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.
पवार-महाडदळकर गटाचे दिलीप वेंगसरकर आणि आशिष शेलार हे एमसीएचे नवे उपाध्यक्ष बनले आहेत. तर संयुक्त सचिवपदाच्या दोनपैकी एक जागा आणि खजिनदारपदावरही पवार-महाडदळकर गटाचीच वर्णी लागली आहे. संयुक्त सचिवपदाच्या लढतीत पीव्ही शेट्टी आणि क्रिकेट फर्स्टच्या उन्मेश खानविलकर यांचा विजय झाला तर रवी सावंत यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला.
याशिवाय खजिनदारपदी नितीन दलाल यांची निवड झाली आहे.

