कोका कोलाचा सलमान खानला झटका

प्रसिद्ध कोल्डड्रिंक कंपनी कोका कोलाने सलमान खानसोबतचा चार वर्षांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सलमान खान कोका कोलाचा ब्रँड अॅम्बेसिडेर होता. कंपनी सलमानच्या जागी रणवीर सिंहशी करार करण्याबाबत चर्चा करतेय.

इंडस्ट्रीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्याच महिन्यात सलमानचा कोका कोलाशी केलेला करार संपला. कोका कोलाने हा करार सलमानसोबत न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.

सलमान प्रचारासाठी प्रत्येक ब्रँडकडून प्रतिवर्षी पाच कोटी रुपये घेतो. 2012मध्ये कोका कोलाने सलमानला पुन्हा ब्रँड अॅम्बेसिडेर बनवले होते. कंपनीने अक्षय कुमारच्या जागी सलमानची निवड केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *