चैनीच्या आयुष्यासाठी ‘ती’ बनली बाईक चोर!

उच्च राहणीमान आणि हाय-फाय जीवन जगण्यासाठी जळगावात एक तरुणी चक्क मोटारसायकल चोर बनलीय.

हेमलता उर्फ ज्योती पाटील असं या लेडी चोराचं नाव आहे. ज्योतीवर अमळनेर पोलिसांतही गुन्हे दाखल आहेत.

ज्योतीचं राहणीमान आणि रुबाबावरुन ती चोर असल्याचं कुणालाही वाटणार नाही. रस्त्यावर उभी असलेली बाईक मोठ्या चलाखीनं चोरण्यात ती पटाईत होती, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

मोटारसायकल चोरीची एक तक्रार रामानंद पोलिसांत दाखल झाली… त्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि पोलिसांनी ज्योतीला अटक केली. तिनं किती मोटारसायकल चोरल्या याची माहिती पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *