फेसबुकवर अमिताभनी गाठले नवे शिखर

फेसबुकवर अमिताभनी गाठले नवे शिखर

हिंदी सिने सृष्टीतील अभिनयाचे शेहनशहा अमिताभ बच्चन जनमानसामध्ये जितके लोकप्रिय आहेत तितकीच सोशल मिडीयावरही त्यांची लोकप्रियता आहे.

सोशल मिडीयावर दिवसागणिक त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. फेसबुकवर अमिताभ यांच्या पाठिराख्यांच्या (फॉलोअर्स) संख्येने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

फेसबुकवर आता अमिताभ यांचे दोन कोटी दहा लाख पाठिराखे  (फॉलोअर्स)आहेत. नजीक भविष्यात हा आकड़ा तीन कोटींच्या पुढे घेऊन जाण्याची इच्छा अमिताभ यांनी व्यक्त केली आहे.

वयाच्या ७२ व्या वर्षीही अमिताभ फेसबुक, टि्वटर या सोशल मिडीयाच्या वेगवेगळया माध्यमात सक्रीय असून, तेथून ते चाहत्यांशी संवाद साधतात. दोन कोटींचा टप्पा ओलांडल्याबद्दल अमिताभ यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *