पाकमध्ये समलिंगी लग्नावरून चौघे अटकेत

पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागात समलिंगी विवाह केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोघा समलिंगी व्यक्तींना मदत केल्याप्रकरणी त्या दोघांसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. सर्वजण झाल मग्सी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांनी गंमत म्हणून निकाह केल्याचे त्यांनी सांगितले.‘

दरम्यान, बलुचिस्तान भागामध्ये समलिंगी विवाह केल्याप्रकरणी पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *