कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाकणी गावाजवळ कंटेनर आणि बोलेरोची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातात नारायण रामचंद्र आलोणे (७२) , गोकुळ रामचंद्र आलोणे (६०) आणि प्रियांका ओंकार आलोणे (२२) यांचा मृत्यू झाला तर सुलोचना आलोणे (६०) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ओकांर आलोणे (२५) या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण अक्कलकोटचे रहिवासी होते.

पुण्यात मुलीला भेटण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी जाताना बोलेरो आणि कंटेनर यांच्यात धडक होऊन ही दुर्घटना घडली.

बेलोरो शुक्रवारी सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली होती. सकाळी नऊच्या सुमारास सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पाकणी फाट्याजवळ बेलोरो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून बोलेरोची जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चारजण जागीच ठार झाले. या अपघातात बेलोरो गाडी चक्काचूर झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *