यापूर्वी महाराष्ट्राच्या विविध शहरात काढण्यात आलेल्या मराठा मूक मोर्चा प्रचंड संख्येने मराठा समाजाने पाठिंबा दिला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. आता यातील पुढील मोर्चा कोल्हापुरात होणार आहे.
त्यामुळे मोठ्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सामील होण्याची आशा मराठा क्रांती मोर्चा तर्फे करण्यात येत आहे.