केबल सेवेसाठी दरमहा भरमसाठ फी आकारण्यावर आता लगाम बसणार आहे. मुंबईसह राज्यातील शहर व खेड्यात असणार्या केबल सेवेसाठी दरमाह 300 ते 350 रुपये मोजावे लागतात. हीच रक्कम आता कमी करण्यासाठी दूरसंचार नियमन प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना 100 फ्री टू एअर वाहिन्या अवघ्या 130 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याच प्रस्ताव आणला आहे. ग्राहकांना त्यांना पाहिजे ती वाहिनी निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक शहरात केबलचे समान दर नाहीत, प्रत्येक शहरात वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यामुळे दरमहा 300 ते 400 रुपये ग्राहकाल मोजावे लागतात. याशिवाय काही ठिकाणी अतिरिक्त वाहिन्यांचे पैसे आकारून ही रक्कम 500 रुपयांच्या घरात जाते. ग्राहकांना त्यांना पाहिजे ती वाहिनी निवडण्याचा अधिकार देण्यात आला असला तरी अनेक वाहिन्या त्यांच्या सर्वच वाहिन्या केबलचालकांना दरमाह एक विशष्ट रक्कम आकारून घ्यायला लावतात. त्यानुसार केबलचालक त्या वाहिन्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत असतो. यामुळे अनेकदा ग्राहकांना त्यांना नको असलेल्या वाहिन्या घ्याव्या लागतात. ग्राहकांना या जाचातून मुक्त करण्यासाठी ट्रायने पुढाकर घेतला असून त्या संदर्भातील एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावार संबंधितांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. आलेल्या सुचनांचा विचार करुन या प्रस्तावानुसार अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या वाहिन्यांपैकी 100 एसडी फ्री टू एअर अर्थात मोफत वाहिन्या ग्राहकांना अवघ्या 80 रुपयांत उपलब्ध करून द्यायच्या आहेत.
यावर ग्राहक व्यवस्थापन, बिलिंग, तक्रारी निवारण, कॉल सेंटर्स आदी सुविधांचे 50 रुपये असे मिळून ग्राहकांना केवळ फ्री टू एअर वाहिन्यांसाठी जास्तीत जास्त 130 रुपये आकारण्याची सूचना करण्यात आली आहे. यावर जर ग्राहकांना पैसे आकारले जाणार्या वाहिन्या हव्या असतील तर ग्राहक त्याचे दर भरून पाहिजे त्या वाहिन्या घेता येण्याची मुभा देण्यात यावी अशी सूचनाही यामध्ये करण्यात आली आहे.