पप्पू यादवने हवाई सुंदरीची छेड काढली

पप्पू यादवने हवाई सुंदरीची छेड काढली

राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी करण्यात आलेले बिहारमधील खासदार पप्पू यादवने जेट एअरवेज मधील एका वरिष्ठ हवाई सुंदरीची छेड काढल्याची घटना मंगळवारी पटनाहून दिल्लीकडे जात असलेल्या विमानात घडली. पप्पू यादवने हवाई सुंदरीशी बिनकामाची हुज्जत घातल्यानं शेवटी विमानातील कॅप्टनला मध्यस्थी करावी लागली.

पप्पू यादव हे आपल्या काही सहका-यासह पटनाहून दिल्लीकडे जेट एअरवेज विमानाने जाण्यासाठी निघाले. पप्पू यादवला १-ए क्रमांकाची सीट मिळाली. विमान उड्डान करण्याआधी सुरक्षेचा उपाय म्हणून हवाई सुंदरीने विमानातील प्रवाशांना सीट बेल्ट बांधण्याची तसेच मोबाईल बंद करण्याची विनंती केली. परंतू पप्पू यादवने त्याकडं अनेकवेळा सांगूनही दुर्लक्ष केलं. त्यानंतर प्रवाशांना लंच देण्यात आले. पप्पू यादवकडून जेवण बॅगेवर पडल्यानंतर पप्पू यादवनं हवाई सुंदरीला बोलावून ते साफ करण्यास सांगितलं. हवाई सुंदरीनं साफ करण्यास नकार देताच पप्पू यादवचा पारा चढला. साफ कर नाही तर चपलेनं मारीन असं म्हणत पप्पू यादवनं हवाई सुंदरीची छेड काढली. पप्पू यादव एव्हढ्यावरच थांबले नाही तर हवाई सुंदरीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हवाई सुंदरीनी जेट एअरवेजकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली.

हवाई सुंदरीचे आरोप बिनबुडाचे हवाई सुंदरीने आपल्यावर लावलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून हवाई सुंदरीचे भांडण माझ्यासोबत झाले नाही तर ते बिझनेस क्लासमधील अन्य चार व्यक्तींसोबत झाल्याचा दावा पप्पू यादवनं केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *