ऐश्वर्या राय बच्चनही अडकली कायद्याच्या कचाट्यात

ऐश्वर्या राय बच्चनही अडकली कायद्याच्या कचाट्यात

बच्चन कुटुंबाच्या अडचणी सध्या वाढलेल्या दिसत आहेत. मॅगीची जाहिरात केल्याने महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असताना, आता ऐश्वर्या राय बच्चनही कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे.

ऐश्वर्याने नुकतीच एक सरबजीतची बायोपिक साईन केली होती. या सिनेमात ती सरबजीतच्या बहिणीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. पाकिस्तानच्या तुरुगांत राहिलेला भारतीय नागरिक सरबजीत याच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे.

ओमंग कुमार हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. ऐश्वर्या राय या सिनेमात सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.

परंतु सरबजीतची खरी बहिण बलजिंदर कौरने या सिनेमावर आक्षेप घेत ओमंग कुमार आणि ऐश्वर्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यासाठी कोर्टात याचिकाही दाखल करण्याचीही तयारी असल्याचं बलजिंदर कौर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *