जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्लस कोरिया यांचे निधन

जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्लस कोरिया यांचे निधन

जगप्रसिद्ध आणि भारतातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तुंची निर्मिती करणारे वास्तुरचनाकार चार्लस कोरिया यांचं मुंबईत काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८४ वर्षाचे होते.

ख्यातनाम वास्तुरचनाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1972 साली पद्श्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2006 साली त्यांना पद्विभूषणने गौरविण्यात आलं होतं. तसेच वास्तुरचना क्षेत्रात केलेल्या कामासाठी कोरिया यांना अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1930 रोजी सिंकदराबादमध्ये झाला होता. त्यांनी मुबंईतील झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.

चार्लस कोरिया यांच्या निधनानंतर पीएमओने देखील ट्वीटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *