सौंदर्य खुलवण्यापासून ते अनेक रोगांवर गुणकारी पुदीना

पुदीन्याच्या चटणी सोबत असली खमंग भजी, पराठे यांसरख्या अनेक पदार्थांची लज्जत आणखी वाढते. तसेच अनेक पदार्थांमध्ये विशेषत: नॉन व्हेज बनवतानाही पुदीना आवर्जून वापरला जातो. व्यजनांचा स्वाद वाढवणाऱ्या या पुदीन्याचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.

सौंदर्य खुलवण्यापासून ते अनेक रोगांवर पुदीना गुणकारी आहे. डोक अथवा पोटात दुखत असल्यास पुदीन्याची पाने चघळल्यास आराम मिळतो. अचानक लागलेली उचकी देखील पुदीन्याची पान खाल्ल्याने थांबते.

ऑइली त्वचेसाठी पुदीना फेशियल उपयुक्त ठरते. दोन मोठे चमचे ताजी वाटलेली पुदीन्याची पाने, दोन मोठे चमचे दही आणि एक मोठा चमचा ओटमील एकत्र करुन याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट दहा मिनीटे चेहऱ्याला लावून नंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. त्वरीत याचा फरक चेहऱ्यावर जाणवतो. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंम्पल्सही कमी होतात.

पुदीन्याच्या रसात मुल्तानी माती मिसळून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होतात आणि चेहरा चमकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *