कोल्हापूरच्या अंबाबाईला नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीनं तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू पाठवण्यात येतो. आज हा मानाचा शालू वाजतगाजत देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला.
अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये अंबाबाईसाठी देवस्थानकडून येणाऱ्या शालूला विशेष महत्त्वाचं स्थान आहे.
एक लाख किमतीचा हा शालू देवीच्या चरणी अर्पण करून सचिव विजय पोवार यांच्याकडं सुपूर्द करण्यात आला. हा शालू विजयादशमीच्या दिवशी देवीला परिधान करण्यात येतो. तसंच नवरात्रोत्सवानंतर या शालूचा जाहीर लिलाव करण्याचीही परंपरा आहे.