माशाच्या तेलातील ओमेगा 3

   माशाच्या तेलातील ओमेगा 3

तारुण्य टिकवण्यासाठी आहार, व्यायाम आणि ध्यानधारणा महत्त्वाची असते. आहार आणि विहार योग्य प्रकारे घेतल्याने आरोग्यही उत्तम राहाते; परंतु तुम्हाला हे ऐकून आश्‍चर्य वाटेल की माशाच्या तेलामध्ये तारुण्य टिकण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे आता माशाच्या तेलालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
नित्याच्या व्यायामाबरोबर माशाच्या तेलाचे सेवन केल्यास व्यक्तीचे तारुण्य अधिक काळ टिकते, असे संशोधनातून आढळले आहे. माशाच्या तेलामुळे व्यक्तीच्या मांसपेशीत नव्याने ताकद येते. परिणामी त्यामुळे त्वचा सतेज राहात असल्याचेही दिसून आले; पण संशोधकांनी मात्र हे तेल पूर्णपणे सौंदर्यवर्धक असल्याचा निर्वाळा दिलेला नाही. यासाठी आणखी सखोल संशोधन आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या तेलाची परिणामकारकता आजमावून पाहण्यासाठी संशोधकांनी 65 वर्षीय महिलांवर प्रयोग केला असता त्यांच्या हाती सकारात्मक निष्कर्ष आले. दरम्यान, माशाच्या तेलात आढळणारा ओमेगा 3 हा घटक हृदयासाठी विशेष फायदेशीर असल्याचे दिसून आले. वृद्धावस्थेत व्यक्तीच्या शरीरातील मांसपेशी आकुंचन पावतात. परिणामी त्वचेवर सुरकुत्या पडत असल्याचे दिसून आले. तसेच गुडघेदुखी, चालताना पायात होणार्‍या वेदना यांना देखील मांसपेशीचे आकुंचन हेच कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे; पण माशाच्या तेलाचा शरीरावर अनुकूल परिणाम होण्यासाठी तेलाचा दर्जा मात्र चांगला असायला हवा, तर त्याचे परिणाम होतात, असेही संशोधकांनी म्हटले आले. अलीकडे माशाच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे हे माशाचे तेल सेवन करण्यापूर्वी ते भेसळयुक्त आहे का, याची खात्री करून, नीटसे पारखून घ्यावे, तरच त्याचा उत्तम फायदा शरीराला मिळणार अथवा त्याचे दुष्परिणाम होऊन आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *