शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे.
पक्षातल्या तरुणांना आता संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे रामदास कदम म्हणालेत. कदम यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. पण रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुलाला संधी मिळण्यासाठी त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.