हाजीअली दर्ग्यात महिलांना तूर्तास प्रवेशबंदीच

हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावरील पुढील सुनावणी १७ ऑक्टोबरला होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने वरळी येथील हाजीअली दर्ग्यात मजापर्यंत महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय काही महिन्यांपूर्वी दिला होता.

दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने २६ ऑगस्ट २०१५ रोजी महिलांना प्रवेशावरील बंदी उठवली होती.

२०११ पर्यंत येथे महिला दर्ग्यात जाऊ शकत होत्या. २०१२मध्ये दर्गा व्यवस्थापनाने महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्यास मनाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *