राष्ट्रीय भारतीय वायू सेनेला ८४ वर्षे पूर्ण

    राष्ट्रीय भारतीय वायू सेनेला ८४ वर्षे पूर्ण

भारतीय वायू सेना आज ८४ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने गाजियाबाद येथे वायू सेनेचे शक्‍तीप्रदर्शन पहायला मिळण्‍याची शक्‍यता आहे. लढाऊ विमाने, हेलिकॉप्‍टर, ट्रान्‍सपोर्ट विमान हे या शक्‍तीप्रदर्शनात भाग घेण्‍याची शक्‍यता आहे.
भारतीय वायू सेना ८४ वर्षे पूर्ण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वायू सैनिकांना व वायू सेनेला शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायू सैनिकांना व त्‍यांच्‍या कुटंबाला सल्‍यूट केले आहे. देशाची अविरत सेवा करत असल्‍याबदल मोदी यांनी सैनिकांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *